Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

इम्रान ताहिरच्या पहिल्या बॉलने केला ‘हा’ अनोखा विश्वविक्रम

Share

लंडन : अखेर क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरवात झाली असून ३० मे ते १४ जुलै या दिवसात वर्ल्ड कॅप्चा थरार पहायला मिळणार आहे. या वर्ल्डकपचं विशेष म्हणजे पहिल्यादा एका विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात पहिलेच षटक फिरकी गोलंदाजाने केले आहे.

दरम्यान आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशांत हा सामना खेळविला जात आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याने फिरकीचा बादशाह इम्रान ताहीर यांच्याकडे पहिले षटक सोपविले.

पहिल्याच षटकात ताहिरने जेसन रॉय यास झेलबाद करत इंग्लडला पहिला झटका दिला. यामुळे देखील वर्ल्डकपच्या इतिहासातील पहिली घटना अशी आहे कि, प्रथमच एका फिरकी गोलंदाजाने साम्ण्याची सुरवात केली.

इंगलंडच्या या वर्ल्डकपमध्ये भारतासह जगभरातील दहा संघ इंग्लंड आणि वॉल्समध्ये यंदा वर्ल्डकप 2019 साठी क्रिकेटच्या मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली खेळला जाणारा भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!