#BigBoss11 : लोणावळा : ‘बिग बॉस’च्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

0

‘बिग बॉस’च्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला.

लोणावळा नगरपरिषदने 27 नोव्हेंबरला बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या टीमला नोटीस बजावली होती.

त्यानुसार दोन व्हीआयपी टॉयलेट जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’ या सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त शोला लोणावळा नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. त्यानुसार आज नगरपरिषदेने दोन व्हीआयपी टॉयलेट जमीनदोस्त केली आहेत.

नोटीस प्राप्त झाल्यापासून 32 दिवसांच्या आत विनापरवाना आणि अनधिकृत पक्के व कच्च्या स्वरुपाचे बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

*