लोणवाडी-पालखेड-लासलगाव रस्ता ‘खड्ड्यात’

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

0

दिंडोरी (किरण ताजणे):   मान्सूनच्या पहिल्याच पावसाने लोणवाडी-पालखेड-लासलगाव रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले असुन, या खड्डयांमूळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

तसेच पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहे.

पावसाआधी बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र मान्सूनच्या पहिल्याच पावसात रस्त्याची चाळणी

झाली आहे. ह्या प्रकरणाचा वेळो-वेळी पाठपुरावा करून देखील बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया

लोणवाडी पालखेड लासलगाव रस्त्यावर मोठ्मोठाले खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यात ते लक्षात येत नाहीत व अनेकांचे अपघात होतात यासाठी बांधकाम विभागाने लवकरात लवकर हे काम पुर्ण करावे अन्यथा या मार्गवरील व सर्व ग्रामस्थ आंदोलन करू.
-समाधान थेटे, पालखेड

बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे व तालुक्यातील प्रतिनिधींनी आवाज उठवुन बांधकाम विभागाला जागे करावे. व रस्त्यांचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, अन्यथा बांधकाम विभागाविरोधात आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांनी दिला आहे.
-योगेश चोपडे,लोणवाडी

LEAVE A REPLY

*