Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

आठवड्यात दोनदा मध्यरात्रीपर्यंत चालले लोकसभेचे कामकाज; जाणून घ्या कारण

Share

नई दिल्ली | वृत्तसंस्था

लोकसभेची कारवाई रात्री १२ वाजेपर्यंत चालली होती. आठवड्यातून दोनदा असे झाल्यामुळे काय कारण असावे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

मंगळवारी लोकसभेचे कामकाज रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत सुरु होते. कृषि  आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या बाबत संबंधावर चर्चा सुरु होती असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

याच महिन्यात 11 जुलै रोजी लोकसभा ११ वाजून ५८ मिनिटापर्यंत सुरु होती. यामध्ये एकूण ९० खासदारांनी सहभाग घेतला होता. या चर्चेची सुरुवात दुपारी पावणेतीनच्या सुमारास झाली होती.

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सांगितले की, काही तांत्रिक कारणे होती त्यामुळे मध्यरात्री लोकसभेची कारवाई स्थगित करावी लागली नाहीतरी पहाटे तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरु असती असे म्हटले होते.

मंगळवारी झालेल्या चर्चेत सदनाच्या कारवाईत शेतकरी आत्महत्या आणि इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती. तर विरोधकांनी शेतीच्या बिघडलेल्या नियोजनाबाबत महिती दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!