Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

Share
सांगली : काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस पक्षाशी नातं तोडल्याचं प्रतीक पाटील यांनी जाहीर केलं आहे. वसंतदादांचं नाव हाच पक्ष असल्याचं प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं लोकसभेचं तिकीट दिलं नाही तर, अपक्ष लढा असा मंत्रही त्यांनी भाऊ विशाल पाटील यांना दिला आहे. आताची काँग्रेस, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींची राहिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सांगलीची जागा शेतकरी संघटनेला देण्यास दादा कुटुंबाचा आक्षेप होता. सांगलीच्या जागेवरुन काँग्रेसमध्ये घमासान सुरु होतं. काँग्रेसची परंपरा असलेली सांगलीची जागा द्यायला अनेक जणांचा विरोध आहे. याशिवाय प्रतिक पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं डावललं जात असल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आज अखेर प्रतिक पाटलांनी काँग्रेसचा राम राम ठोकून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शेट्टींना कळतं, पण आमच्या पक्षाला कळत नाही…

‘आता सांगलीमध्ये काँग्रेस कमजोर आहे, काँग्रेस संपली आहे, अशी चर्चा व्हायला लागली आणि मग राजू शेट्टींना ही जागा द्यायची भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली. ही जागा मिळाल्यावर राजू शेट्टींनी फोन केला आणि तुम्हाला घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही. राजू शेट्टींना कळतं, पण आमच्या पक्षाला कळत नाही,’ अशी खंत प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!