Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

Loksabha : मिसेस विखेंसह 6 जण निवडणुकीतून आऊट

Share
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धनश्री विखेंसह तब्बल 22 इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने 31 इच्छुकांचे 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जाची छाननी आज शुक्रवारी झाली. त्यात धनश्री सुजय विखे यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

दाखल झालेल्या अर्जाची आज शुक्रवारी छाननी झाली. या छाननीत धनश्री विखे यांच्या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म असल्याने तो अर्ज बाद करण्यात आला. सुजय विखे यांनीही अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याने त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.

यासोबतच अपक्ष भागवत धोंडीबा गायकवाड, विलास सावजी लाकुडझोडे तसेच क्रांतीकारी जयहिंद सेेनेचे पोपट गंगाधर दरेकर, भारतीय मायनारिटीज पार्टीचे जाकीर रतन शेख, हिंदू एकता आंदोलन पार्टीचे सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांचे अर्ज छाननीत बाद झाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!