चितेगाव फाट्याजवळ भीषण अपघात, वरिष्ठ पत्रकार गणेश धुरी ठार

0

नाशिक, ता.7 : औरंगाबाद रस्त्यावरील चितेगाव फाटा येथील भीषण अपघातात दैनिक लोकमत चे वरिष्ठ उपसंपादक गणेश कृष्णाराव धुरी (37)  ठार झाले. काल बुधवारी रात्री साडे दहा वाजता ही दुर्घटना घडली.

नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून परतीचा प्रवास करताना चितेगाव फाटा येथे त्यांच्या स्विफ्ट कारला उसाच्या भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत धुरी यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांच्यासोबत असलेले संतोष कासार हे देखील जखमी झाले आहेत.

जखमी अवस्थेत धुरी यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, भाऊ आणि पाच बहिणी असा परिवार आहे. अभ्यासू आणि धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने नाशिकच्या पत्रकार सृष्टीत शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

*