Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

लोखंडेंना मतदार पावले

Share

पुन्हा संधीचा इतिहास: नाराजी मतदानातून दूर

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिर्डी मतदारसंघात सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी नवा इतिहास लिहीला आहे. मतदारसंघ आरक्षीत झाल्यापासून पुन्हा संधी न देण्याची आणि नाराजीच्या लाटेतही तरण्याची प्रथा त्यांनी मोडून काढली आहे. अर्थात त्यांच्या विजयात ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील किंगमेकर ठरले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरूनही मतभेद होते. सदाशिव लोखंडे 2014च्या मोदी लाटेत अवघ्या 14 दिवसांत खासदार झाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी मतदारांशी संपर्क न ठेवल्याचा मुद्दा या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा झाला. मात्र त्यांना पुन्हा एकदा मोदी लाट आणि डॉ.सुजय विखेंच्या राजकीय नियोजनाने विजयी केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने श्रीरामपूरचे आ. भाऊसाहेब कांबळे यांना मैदानात उतरविले होते. त्यांच्या विजयासाठी आ.बाळासाहेब थोरात मैदानात उतरले होते.

या राखीव मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीही मैदानात होती. मात्र मुख्य लढत सेना-काँग्रेस अशीच रंगली. या लढतीच्या निमित्ताने विखे-थोरात वादही चांगलाच रंगला. आपल्या उमेदवारला विजयी करण्याचा चंग या नेत्यांनी बांधला होता. अखेरच्या टप्प्यात विखेंच्या यंत्रणेेने मतदारसंघात जोरदार प्रचार केला. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. दरम्यान, लोखंडेंच्या विजयानंतर उत्तर नगर जिल्ह्यात विखे गटाची ताकद चांगलीच वधारली आहे. याचे परिणाम आगामी राजकारणावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!