Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

लोकसभेतही विधेयक मंजूर; जम्मू-काश्मीर मधून कलम 370 हद्दपार

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

राज्यसभेपाठोपाठ आज लोकसभेतही कलम ३७० रद्द करण्याचं ऐतिहासिक विधेयक ३५१ विरुद्ध ७२ मताने मंजूर करण्यात आल आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयकही ३६६ विरुद्ध ६६ मतांनी मंजूर करण्यात आहे. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ही दोन्ही विधेयकं मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही राज्ये अस्तित्वात येण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे काश्मीर ३७० कलम मुक्त करण्याचे भाजपच स्वप्न साकार झाल आहे.

आज सकाळी ११ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचे, जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे आणि जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचे विधेयक मांडले होते. या तिन्ही विधेयकांवर सभागृहात चर्चा झाली होती. यावेळी सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अमित शहा यांनी उत्तरे हि दिली होती. त्यानंतर सायंकाळी सव्वा सात वाजता या विधेयकांवर मतदान घेण्यात आले होते.

यावेळी अमित शहांनी सामाजिक संकल्प विधेयकावर मतदान घेण्यात आले. त्याच्या बाजूने ३५१ मते पडली तर विधेयकाच्या विरोधात ७२ मते पडली होती. एकूण ४२४ सदस्यांनी यावेळी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. तर एक खासदार अनुपस्थित राहिला. या सामाजिक संकल्प विधेयकात संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचीही तरतूद आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयकावर मतदान घेण्यात आले असता मतदानाच्या बाजूने ३६७ आणि विरोधात ६७ मते पडली. यावेळी जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयकही मंजूर करण्यात आले. ही सर्व विधेयकं संविधानिक प्रक्रियेनुसारच मंजूर करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!