Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गांधीनगरला जाणार

Share
मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा लोकसभा निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातला जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी शहांनी उद्धव ठाकरेंना गुजरातला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्धव यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे.

सध्या राज्यसभेचे खासदार असलेले अमित शहा यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. ते उद्या गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील. मात्र त्याआधी भव्यदिव्य रोड शो केला जाईल. त्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलं आहे.

ठाकरे यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. शिवसेना आणि भाजपामधील संबंध गेल्या चार वर्षांमध्ये अतिशय ताणले गेले होते. मात्र फेब्रुवारीत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून एकी दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गांधीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. ९१ वर्षीय लालकृष्ण आडवाणी १९९८ पासून गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडून येते होते. आता मात्र अमित शाह या मतदारसंघातून आपले नशिब आजमावणार आहेत.

अमित शाह पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांना प्रचारात कोणतीही कसूर राहणार नाही, याची काळजी घेत आहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या उद्याच्या रोड शो मध्ये उद्धव यांच्यासह एनडीए आघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. उद्धव आणि अमित शहा यांच्या या दिलजमाईमुळे शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने लढतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!