Thursday, May 9, 2024
Homeदेश विदेशनिवारा केंद्रातील साडेतिनशे मजूर श्रमिक रेल्वेतून मायभूमीकडे रवाना

निवारा केंद्रातील साडेतिनशे मजूर श्रमिक रेल्वेतून मायभूमीकडे रवाना

नाशिकरोड | प्रतिनिधी

राज्यातील परप्रांतातील अडकलेल्या नागरिकांसाठी शासनाने श्रमीक रेल सुरू केली आहे. आज नाशिक मधून भोपाळ साठी पहिली सहा डब्यांची गाडी रवाना होत आहे. यामध्ये जवळपास साडेतीनशे प्रवासी आपल्या मायभूमीकडे प्रयाण करणार आहेत. या प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून प्रत्येकाकडे तपासणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याठिकाणी जिल्हानिहाय बैठक व्यवस्था करण्यात आली असून नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकरोड रेल्वेस्टेशन गाठत प्रवाशांना जाण्यासाठीची व्यवस्था पहिली.

- Advertisement -

नाशिकमधील विविध निवाला केंद्रांमध्ये ठेवण्यात आलेल्या परप्रांतीय बांधवांचा मध्य प्रदेशातील भोपाळसू व उत्तर प्रदेशातील बनारस या शहरांना पोहोचवण्याची व्यवस्था श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

शहरातील पंचवटी, आनंदवल्ली, मसरुळ, पाथर्डी, मुंबई नाका नवीन नाशिक अशा विविध भागात म्हणून 354 प्रवाशांना घेऊन ही गाडी भोपाळ कडे रवाना होणार आहे. मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांची जिल्हानिहाय स्वतंत्र डबे याचवेळी ठेवण्यात आली आहे.

सायंकाळी सहा वाजता विविध निवारा केंद्रांमधून बसच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात या बांधवांना रेल्वे स्टेशन वर आणण्यात आले. निवारा केंद्रातील नावाने व नोंदींचे आधारांवर त्यांना रेल्वे प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वेस्टेशन परिसराला जणू पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विविध भागातील पोलिस अधिकारी वरिष्ठ अधिकारी रेल्वेचे पोलिस अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या