Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसुरत येथून 72 मजूरांना पारोळा येथे नेणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा

सुरत येथून 72 मजूरांना पारोळा येथे नेणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार –

संचारबंदीत प्रवासी वाहतुकीला बंदी असतांनाही सुरत मांडवी येथून वीटभट्टीवर काम करणार्‍या 72 मजुरांना दोन आयशर टेम्पोमध्ये बसवून पारोळा येथे घेवून जाणार्‍या चौघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरांची जिल्हा रूग्णायात तपासणी करुन क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने संचारबंदी लागू आहे. दळण-वळण व्यवस्था बंद करुन जिल्ह्याच्या सिमाहद्दी सिलबंद करुन नाकाबंदी करण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तुंची वाहने वगळता अन्य वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

शासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले असतांना नंदुरबार शहरातील धानोरा रस्त्यावर नाकाबंदी करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना दोन आयशर टेम्पोमध्ये 72 मजूर आढळून आले. यावेळी पोलीसांनी चौकशी केली असता हे मजुर सुरत मांडवी येथे वीटभट्टीवर काम करणारे असून त्यांना जळगांव जिल्ह्यातील पारोळा येथे घेवून जाण्यात येत होते.

आयशर (क्र.एम.एच.18 बी.जी.3377) या वाहनाचा चालक हेमंत सुशांत भदाणे व मालक प्रविण रविंद्र पाटील तर दुसरा आयशर (क्र.एम.एच.18 बी.ए.0711) या वाहनाचा चालक गुलाब बुधा बिर्‍हाडे व मालक भुषण बाळु पवार हे वाहनात 72 मजुरांना बसवून वीटभट्टीच्या मालकाने सांगितल्यानुसार पारोळा व शिरपूर येथे सोडण्यासाठी जात असल्याचे सांगितले. यावेळी नाकाबंदीवर असलेल्या पोना.अमोल जाधव, पोहेकॉ.इंदिरा वळवी, पोना.राजन पाडवी, हेकॉ.चुनिलाल ठाकरे यांनी मजुरांना ताब्यात घेत जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. या 72 मजुरांची तपासणी करण्यात येवुन क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या सिमाहद्दी सिलबंद असतांनाही दोन्ही वाहनातून अवैधरित्या मजुरांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोहेकॉ चुनिलाल आसाराम ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वाहनचालक हेमंत सुशांत भदाणे व मालक प्रविण रविंद्र पाटील दोन्ही रा.बांभोरी ता.धरणगांव, वाहनचालक गुलाब बुधा बिर्‍हाडे रा.शेडावे ता.पारोळा व मालक भूषण बाळू पवार रा.सबगव्हाण ता.पारोळा या चौघांविरुध्द भादंवि कलम 188, 269, 270, 271, 290 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 54 सह साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 03 सह मोटारवाहन कायदा कलम 66/ .92 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अहिरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या