Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रBREAKING : आरोग्यमंत्र्यांची घोषणा : राज्यात लॉकडाऊन वाढणार

BREAKING : आरोग्यमंत्र्यांची घोषणा : राज्यात लॉकडाऊन वाढणार

मुंबई :

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी झालेला नाही. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ म्हणजेच लॉकडाऊन लावण्यात आला आहे. एक मेपर्यंत असलेला लॉकडाऊन आणखी वाढण्यात येणार आहे. लॉकडाऊन किती दिवसांनी वाढवावा, हा निर्णय शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

ठरलं ! राज्यात सर्वांना मोफत लस, सहा महिन्यात सर्वांचे लसीकरण

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आदी मुद्यांवर चर्चा झाली. लॉकडाऊन लावल्यामुळे काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आटोक्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर लॉकडाऊन वाढवावा, अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे. यामुळे शेवटी लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.

राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. फक्त लॉकडाऊन आणखी किती दिवस, काय सुरु राहणार व काय बंद राहणार हे शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले.

राज्यात १ मे पासून लसीकरण नाही

वडेट्टीवारांनी कालच दिले होते संकेत

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत मंगळवारी दिले होते. कोरोना बाधितांची संख्या मुंबईत कमी होत आहे. पण राज्यातील इतर शहरांत अद्याप कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. यामुळे सध्याच्या लॉकडाऊन कालवधी पुन्हा वाढवण्यात येईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या