मुंबई : परप्रांतीय कामगारांना चिथावणी देणार्‍यासह एक हजार जणांवर गुन्हे

jalgaon-digital
1 Min Read

सार्वमत

मुंबई – परप्रांतीय कामगारांची दिशाभूल करुन मुंबईतल्या वांद्रे स्थानकाबाहेर लॉकडाऊनच्या काळात देखील गर्दी जमवल्याप्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. विनय दुबे असे त्याचे नाव आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीमधून त्याला अटक करण्यात आले आहे. तसेच, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कलम 144चे उल्लंघन केल्याप्रकरणी 800-1000 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

विनय दुबेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलनाचा इशारा त्याने दिला होता. तसेच त्याने यासंबंधी फेसबुक पोस्ट लिहून आणि ट्विट करून चेतावणी दिली होती. स्थलांतरित मजुरांना 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन शिथील होईल, असे त्यांना वाटले होते. तसा त्यांनी अंदाज बांधला होता.

परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुपारनंतर साडे चार वाजता वांद्याच्या स्टेशनबाहेर हजारो कामगारांनी एकत्र येऊन गोंधळ केला. याप्रकरणी विनय दुबेवर आरोप ठेवत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *