Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedलॉकडाऊन : वडिलांच्या औषधांसाठी मुलाचा खामगाव ते अकोला पायी प्रवास

लॉकडाऊन : वडिलांच्या औषधांसाठी मुलाचा खामगाव ते अकोला पायी प्रवास

श्रावण बाळाने अंध आई-वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी पायदळ यात्रा केली होती. श्रावण बाळाच्या या गोष्टीने प्रेरीत एक तरूण अर्धांगवायू झालेल्या वडिलांच्या औषधांसाठी चक्क खामगाव ते अकोला हे ४४ किलोमीटरचे अंतर एका रात्रीतून पायी चालत पार करीत बुधवारी सकाळी औषध घेण्यासाठी अकोल्यात पोहोचला.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना आता बसू लागला आहे. दीर्घ आजाराच्या रूग्णांच्या उपचाराचे प्रश्न, जेष्ठ नागरिकांच्या औषधंचा प्रश्न गंभीर होतांना दिसत आहे.
लॉकडाऊनचा फटका बसलेला असाच एका अर्धांगवायू झालेल्या रूग्णाच्या मुलाने पितृऋण चुकवितांना चक्क रात्रीतून प्रवास केला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या चितोडा येथील तरूण सुरज गवई हा मंगळवारी रात्री गावातून पायी निघाला.
रात्री राष्ट्रीय महामार्गावर एखादे वाहन मिळेल आणि अकोल्यापर्यंत पोहोचता येईल, असे त्याला वाटले. मात्र लॉकडाऊनने त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. वडिलांचे औषध कोणत्याही परिस्थितीत घेवून जायचेच असा निर्धार केलेल्या सुरजने त्याचा प्रवास पायीच सुरू केला. रात्रीतून ४४ किलोमीटर अंतर कापत सकाळी ६ वाजता अकोल्यात बाळापूर नाक्यावर पोहोचला.
रत्यात न पिण्यासाठी पाणी मिळाले न खाण्यासाठी. दृढनिश्चय केलेल्या सुरजने हा पायी प्रवास पूर्ण केला आणि अकोल्यात बाळापूर नाक्यावर त्याला पोलिसांनी अडवले. अखेर त्याने अकोला मेडिकलचे संचालक प्रदीप गुरूखुद्दे यांच्याशी संपर्वâ साधला आणि त्याच्या पुढच्या अडचणी दूर झाल्यात.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रदीप गुरूखुद्दे यांनी सुरजचा फोन आला तेव्हा तो कोण, कुठून आला याचा विचार न करता थेट त्याला मदत केली. डॉ.बिलाला यांच्याकडे सुरजच्या वडिलांचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे तो नियमितपणे अकोला मेडिकलवरून औषध घेवून जातो.
औषध संपल्याने वडिलांना त्रास नको म्हणून त्याने ५० किलोमीटरचे अंतर धैर्याने पार केले. येथे आल्यानंतर त्याला गुरूखुद्दे यांनी जेवन दिले, औषध दिले आणि सचिन अहीर या कर्मचाNयाच्या माध्यमातून गावी जाण्यासाठी वाहनाची सुविधाही करून दिली.
- Advertisment -

ताज्या बातम्या