Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपरप्रांतीयांना दिलासा : मुंबईतून 10 रेल्वेगाड्या उत्तर प्रदेशला जाणार

परप्रांतीयांना दिलासा : मुंबईतून 10 रेल्वेगाड्या उत्तर प्रदेशला जाणार

सार्वमत 

फडणवीसांचा रेल्वेमंत्र्यांना आणि योगी आदित्यनाथ यांना फोन
मुंबई – करोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. अशांसाठी 10 रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणार आहेत. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
रेल्वेगाड्या सोडाव्यात यासाठी फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. याबाबतची माहिती स्वतः फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.

- Advertisement -

ट्विटमध्ये म्हटले आहे, अजूनही बरेच कामगार बांधव रस्त्याने पायीच प्रवास करताना दिसत आहेत. बहुतेक शहरांमधून पुढे येत असलेले हे चित्र अतिशय विदारक आणि सुन्न करणारे आहे. माझी राज्य सरकारला पुन्हा विनंती आहे की, केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे. या कामगारांना पायी जाण्यापासून तत्काळ रोखावे आणि केंद्र सरकारशी योग्य समन्वय साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल, अशी व्यवस्था करावी. औरंगाबादनजीक घडलेल्या घटनेनंतर तरी किमान यातून बोध घेण्याची नितांत गरज आहेे.

- Advertisment -

ताज्या बातम्या