Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक: स्मार्टसिटी अंतर्गत शहरातील स्वच्छतागृह आता गूगल मॅपवर

Share

नाशिक : शहरात अनेकदा महिला तसेच जेष्ठ नागरिकांना सार्वजनिक शौचालयांचा अभाव दिसून येत असल्याने समस्या निर्माण होता. शहरात असणारे शौचालये लवकर शोधणे कठीण जाते. दरम्यान नाशिक महानगरपालिकेने हीच अडचण दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक शौचालयांची माहिती पालिकेने गुगल मॅपवर प्रसिद्ध केली असून आता सार्वजनिक शौचालये शोधणे सोपे जाणार आहे.

दरम्यान यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत टॉयलेट्स गुगलमॅप आल्यामुळे नागरिकांनी सोपे पडणार आहे. कोणतेही गोष्ट शोधण्यासाठी आपण गुगल करत असतो. हाच पर्याय घेऊन नाशिक महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे.

विशेषत: महिलांसाठी ही गोष्ट फारच अडचणीची ठरत असते. मात्र यापुढे स्वच्छतागृहांची शोधाशोध करण्याची आवश्यकता उरलेली नाही. स्वत:जवळील मोबाइलमधल्या गुगल मॅपवर ‘टॉयलेट’ असे टाइप केले की तुम्ही असलेल्या परिसरात स्वच्छतागृहे कुठे आहे याची माहिती लगेचच मिळणार आहे.

आता गुगल मॅप सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. गुगल मॅपवर ‘पब्लिक टॉयलेट’ असे शोधल्यानंतर जवळच्या सार्वजनिक शौचालयाचा मार्ग सहजपणे सापडतो. सर्च केल्यास जवळच्या सार्वजनिक टॉयलेटचा मार्ग गुगल दाखवेल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!