Photo Gallery : नांदूरमध्यमेश्वरमध्ये पर्यटकांची मांदियाळी

0
निफाड (आनंद जाधव) | नांदूरमध्यमेश्वर धरणातून सर्वात जास्त पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी अनेक पर्यटकांनी नांदूरमध्यमेश्वर गाठले होते.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा आजही जोर कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

अनेक पर्यटक आज नांदूरमध्यमेश्वर धरणावर आले. रात्रीपासून नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाणी हळहळू सोडण्यात येत आहे.

सकाळी ३१ हजार क्युसेस सोडले त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास ४९ हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले होते त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास सर्वाधिक  8 गेट मधून 61हजार 138क्युसेस   पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*