कोपरगावात करोनाचा 24 वा बळी

दिवसभरात आढळले 35 करोनाबाधित
कोपरगावात करोनाचा 24 वा बळी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 46 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 105 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 25 रुग्ण तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 5 रुग्ण तर खासगी लॅबमधील 5 रुग्ण असे एकूण 35 रुग्ण करोना बाधित आढळून आले. 15 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

शहरातील सुभाष नगर येथील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसभरात एकूण 35 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील साईसिटी येथील 1, महादेवनगर येथील 9, निवारा येथील 1, मांढरे बिल्डिंग येथील 1, खाटीक गल्ली येथील 1, गोकुळनगरी येथील 1, तर ग्रामीणमधील संजीवनी येथील 3, उक्कडगाव येथील 13,धामोरी येथील 2, येसगावं येथील 1, चासनळी येथील 1, खोपडी येथील 1 असे एकूण 35 रुग्ण दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

तालुक्यात आजपर्यंत एक हजार 334 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 167 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. एक हजार 143 रुग्ण बरे झाले आहेत. 5 हजार 560 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 23.99 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.79 टक्के आहे. 24 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com