
अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुरू असलेली कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया अखेर शनिवारी संपली. 11 विभागांतील बदली पात्र एकूण 254 बदल्या करण्यात आल्या. त्यात 42 प्रशासकीय, 138 विनंती, तर 74 आपसी बदल्यांचा समावेश होता. यंदा करोना महामारीत कर्मचार्यांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पार पडली. या प्रक्रियेचे सर्वच स्तरातून स्वागत झाले.
विभागनिहाय बदल्यामध्ये सामान्य प्रशासन विभागात कक्ष अधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक अशा 32 बदल्या झाल्या. ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी सांख्यिकी अशा एकूण 41 बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागात पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी सांख्यिकी अशा 18 बदल्या झाल्या. प्राथमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख अशा 14 बदल्या झाल्या.
अर्थ विभागात सहायक लेखाधिकारी, कक्ष लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक अशा एकूण 9 बदल्या झाल्या. पशुसंवर्धन विभागात सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक अशा 9 बदल्या झाल्या. कृषी विभागात कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी कृषी अशा 6 बदल्या झाल्या. बांधकाममध्ये शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता सहायक 8, तर लघूपाटबंधारे विभागात शाखा अभियंत्याच्या 5 बदल्या झाल्या.
ग्रामीण पाणीपुरठा विभागात दोन शाखा अभियंत्यांच्या बदल्या झाल्या. आरोग्य विभागात सर्वाधिक 102 बदल्या आरोग्य विभागात आरोग्य पर्यवेक्षिका (1), औषध निर्माण अधिकारी (7), आरोग्य सहायक पुरूष (6), आरोग्य सहायक महिला (9), आरोग्य सेवक महिला (52), आरोग्य सेवक पुरूष (27) अशा एकूण 102 सर्वाधिक बदल्या झाल्या.
बदलीपात्र कर्मचार्यांना संबंधित तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्यासमोर बोलावून बदली प्रक्रिया राबवण्यात आली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न मिटला. आता बदली झालेल्या कर्मचार्यांना बदलीचे आदेश सोमवारपासून जिल्हा परिषद संकेत स्थळावर टाकण्यात येणार आहेत. नगरच्या ऑनलाईन पध्दतीने राज्यातील अन्य जिल्हा परिषद अनुकरण करत आहेत.
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग.