झेडपीच्या तीन विभागांतील 73 कर्मचार्‍यांच्या बदल्या

झेडपीच्या तीन विभागांतील 73 कर्मचार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत, महिला बालकल्याण व प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण 73 जणांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून जिल्हा परिषदेत ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार मंगळवारपासून जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बदलीस पात्र असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना जिल्हा मुख्यालयात न बोलावता संबंधित गट विकास अधिकारी यांच्यासमोर बोलावून ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवली जात आहे.

बुधवारी ग्रामपंचायत विभागाअंतर्गत 4 ग्रामसेवकांच्या विनंती व 25 आपसी, तर ग्रामविकास अधिकार्‍यांच्या 1 विनंती व 5 आपसी बदल्या करण्यात आल्या. पंचायत विस्तार अधिकारी यांची 1 प्रशासकीय, 1 विनंती व 2 आपसी बदल्या करण्यात आल्या. याशिवाय सांख्यिकी विभागाच्या एका विस्तार अधिकार्‍यांची ऑनलाईन प्रशासकीय बदली करण्यात आली.

महिला बालकल्याण विभागाअंतर्गत 16 पर्यवेक्षिकांच्या बदल्या झाल्या. त्यात 5 प्रशासकीय, 10 विनंती व 1 आपसी बदलीचा समावेश आहे. सांख्यिकी विभागाच्या एका विस्तार अधिकार्‍यांची 1 प्रशासकीय तर 1 विनंती बदली करण्यात आली. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी यांची 1 प्रशासकीय 1 विनंती बदली झाली. तर एक केंद्रप्रमुख यांची प्रशासकीय व 8 विनंती बदल्या करण्यात आल्या. गुरुवारी दिवसभरात अर्थ पशुसंवर्धन कृषी व बांधकाम विभागातील अधिकार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com