चार विभागांतील 32 कर्मचार्‍यांच्या बदल्या
सार्वमत

चार विभागांतील 32 कर्मचार्‍यांच्या बदल्या

जिल्हा परिषद : अर्थ-बांधकाम विभागात आपसी बदल्या वर्ज्य

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा परिषदेत दोन दिवसांपासून विभागनिहाय ऑनलाईन पध्दतीने व्हिडिओ कॉन्फरन्स पध्दतीने कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. गुरूवारी चार विभागांतील 32 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात 12 प्रशासकीय, 16 विनंती आणि 4 आपसी बदल्यांचा समावेश आहे. यात बांधकाम आणि अर्थ विभागात योग्य उमेदवार न मिळाल्याने आपसी बदल्या झाल्या नाहीत.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी अर्थ विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया सेवाज्येष्ठता, प्रशासकीय, विनंती आणि आपसी पध्दतीने करण्यात आली. अर्थ विभागात सहाय्यक लेखाधिकारी 1 प्रशासकीय 1 विनंती, कनिष्ठ लेखाधिकारी 1 प्रशासकीय 1 विनंती, वरिष्ठ सहाय्यक 1 प्रशासकीय 2 विनंती, कनिष्ठ साहय्यक 1 प्रशासकीय 1 विनंती अशा बदल्या करण्यात आल्या.

पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी 1 प्रशासकीय 2 विनंती, पशुधन पर्यवेक्षक 1 प्रशासकीय 3 विनंती आणि 2 आपसी. कृषी विभागात कृषी अधिकारी 1 प्रशासकीय, विस्तार अधिकारी कृषी 1 प्रशासकीय 2 विनंती आणि 2 आपसी. बांधकाम विभागात शाखा अभियंता 1 प्रशासकीय 3 विनंती, स्थापत्य अभियंता सहाय्यक 3 प्रशासकीय 1 विनंती या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.

आज दिवसभरात

सकाळच्या सत्रात लघु पाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता, स्था. अ. सहायक यांच्या बदल्या होतील. तर दुपारी आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक पुरुष, आरोग्य सहायक महिला, आरोग्य सेवक पुरुष व महिला यांच्या बदल्या होतील.

Deshdoot
www.deshdoot.com