अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारचे आदेश आणि पालकमंत्र्याच्या सुचनेनुसार शासकीय कार्यालयात अभ्यागतांना बंदी घालण्यात आली

असून अत्यावश्यक असणार्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या सुचनेचे मंगळवारपासून जिल्हा परिषदेत सक्तीने पालन करण्यात सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे सर्व प्रवेशव्दार बंद करण्यात आले असून केवळ कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकार्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सध्या काही कर्मचारी करोना बाधित आढळून आलेले आहेत. यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वच विभागात 50 टक्के कर्मचार्यांची उपस्थिती ठेवण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेत साधारण 400 ते 450 कर्मचारी कार्यरत असून याठिकाणी या संख्येच्या दुप्पट व्हिजीटर्स आपली विविध कामे आणि प्रश्न घेवून येत असतात. नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रार्दभाव वाढत असून यामुळे बाहेरचे बाधित व्यक्तीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांना करोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने प्रशासनाने कालपासून सक्तीने अभ्यांगतांना प्रवेश बंद घातली आहे.

तालुक्याच्या पातळीवरून टपाल घेवून येणार्या कर्मचार्यांची टपाल प्रवेशद्वारात संकलित करण्यात येत असून त्याठिकाणी ते निर्जुंकिकरण करण्यात येवून मध्यावर्ती टपाल कक्षात पाठविण्यात येत आहे.