
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या मीडिया प्लॅटफॉर्म अंतर्गत फेसबुक, युटूब, बॅलग, ट्विटर आणि इंन्सटाग्रामचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले. अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व शाळा संगणकाच्या, मोबाईलच्या एका क्लिक वर आणणारी नगर जिल्हा परिषद आता राज्यात अव्वल ठरणार आहे.
अशा या एका स्मार्ट पीडीएफमध्ये कोणीही कोणत्याही सोशल मीडिया आयकॉनवर क्लिक कल्यानंतर संबंधीत साईट जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची माहिती व उपक्रम पाहता येणार आहे. तसेच जिल्ह्याच्या नकाशातील कोणत्याही तालुक्याला क्लिक केले असता त्या तालुक्यातील सर्व शाळांची यादी दिसेल व यादीतील ज्या शाळेच्या नावावर क्लिक केले त्या शाळेची वेबसाईट ओपन होवून त्या शाळेविषयी माहिती पाहायला मिळेल.
अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व शाळा एका क्लिकवर आणणारी नगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या या आयटीसेलचे काल उद्घाटन झाले असून ती तयार करण्यासाठी विस्तार नगर रविंद्र कापरे, जामखेडच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रवी भापकर, मिरजगावच्या मुलींच्या शाळांचे शिक्षक डॉ. बाबासाहे पवार आणि नेवासाच्या भेंड्याच्या शाळेचे शिक्षक अशोक पंडित यांनी योगदान दिले आहे.