अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या इमारतीत बंद असलेल्या दोन्ही लिफ्ट लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

शासनाने दोन्ही नवीन लिफ्टच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील दोन्ही लिफ्ट गेल्या वर्षभरापासून बंद होत्या. कालबाह्य झाल्याने प्रशासनाने त्या बंद केल्या होत्या. नवीन लिफ्टची उभारणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून तरतूद करण्याचा ठराव करत हा प्रस्ताव जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडे पाठवला होता.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर 18 फेब्रुवारी रोजी शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने जिल्हा परिषदेत नवीन लिफ्ट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.