झेडपीच्या कायदेशीर सल्लागारपदी अभिषेक भगत

झेडपीच्या कायदेशीर सल्लागारपदी अभिषेक भगत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हास्तरीय कामकाज पाहण्यासाठी नगरचे विधिज्ञ अ‍ॅड. अभिषेक भगत यांची

कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना या नियुक्तीचे पत्र दिले आहे. अध्यक्षा राजश्रीताई घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी अ‍ॅड. भगत यांचे अभिनंदन केले आहे.

अ‍ॅड. भगत यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात जिल्हा परिषदेवतीने दिवाणी व फौजदारी कामे, औद्योगिक व कामगार न्यायालयातील कामे, तसेच जिल्हा ग्राहक मंच, सहकार न्यायालयातील जिल्हास्तरीय प्रकरणात कायदेशीर काम पाहावे लागणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग यांच्या न्यायालयातील कामकाज, जिल्हा परिषदेमधील सर्व खात्यांचे व खाते प्रमुखांकडील न्यायालयातील प्रकरणांचे कामकाज पाहणे, न्यायालयीन सल्ला देणे व मार्गदर्शन करणे आदी जबाबदार्‍या अ‍ॅड. भगत यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत.

अ‍ॅड. भगत यांचा वकिल क्षेत्रात असलेल्या दांडग्या अनुभवामुळेच जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com