तीन दिवसीय राज्यव्यापी संपात झेडपी कर्मचारी होणार सहभागी

महासंघाच्या नगरमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय
तीन दिवसीय राज्यव्यापी संपात झेडपी कर्मचारी होणार सहभागी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने महाराटष्र् राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना दि. 27 ते 29 जानेवारी या कालावधीत तीन दिवसांचा संप करून आंदोलन करणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी गट ड कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या अध्यक्षतेखाली नगरमध्ये झालेल्या बैठकीत या आंदोलनाची घोषणा करण्यात आली.

वर्षानुवर्षे गट ‘ड’ कर्मचार्‍यांचे प्रश्न जैसे थे असून सरकारने उदासिनता सोडून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीस महासंघाचे कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे, परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काळापहाड, राज्य कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे, कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, सागर आगरकर, सुरेश भोजणे, निलेश गाडेकर, चंद्रकांत पाचारणे, श्रीकांत ढगे, ऋषीकेश बनकर, श्यामसुंदर शेळके, लहानू उमाप, मिरा पतंगे आदी उपस्थित होते.

शासनाने वर्ग 4 ची पदे निरसित करू नये, चतुर्थश्रेणीची 25 टक्के पदे निरसित करण्याचा 14 जानेवारी 2016 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यायवा, चतुर्थश्रेणी सेवांचे व कर्मचार्‍यांचे खासगीकरण, कंत्राटीकरण करू नये, अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट तात्काळ करावी, वेतनत्रुटीसंदर्भातील खंड 2 च्या अहवालाची अंमलबजावणी करावी, सातव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत तसेच महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित मिळावी, सन 2005 नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचार्‍यांना लागू केलेली अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com