
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सभासद हिताचा निर्णय घेत सभासदांच्या कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जाचा व्याजदर आता 9 टक्के झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन विलास शेळके यांनी दिली.
संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना पॅनल प्रमुख व संचालक संजय कडूस यांनी सांगितले, सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जय श्री गणेश पॅनलने सभासदांना जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळाने तातडीने सभासद हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या आश्वासनांमध्ये कर्जावरील व्याजदर टप्प्याटप्प्याने कमी करून सभासदांवरील आर्थिक बोजा कमी करण्याचा विषय होता. त्यामुळे या पूर्वी असलेला कर्जावरील व्याजदर 9.5 टक्क्यांवरून अर्धा टक्का कमी करत तो 9 टक्के करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
ज्येष्ठ संचालक अरुण जोर्वेकर यांनी सांगितले, सभासदांना दिलेल्या सर्व आश्वासनांची लवकरात लवकर पूर्तता करून संस्थेला अधिकाधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषद कमर्चारी सोसायटी ही कर्मचार्यांची कामधेनू आहे. याप्रसंगी व्हाईस चेअरमन काशिनाथ नरोडे, संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, संचालिका ज्योती पवार, सुरेखा महारनुर, मनीषा साळवे, संदीप मुखेकर, सरला कदम, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे आदी उपस्थित होते.