शिक्षकांना पाच कोटींची घरे भाडे कशासाठी ?

जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत सवाल
शिक्षकांना पाच कोटींची घरे भाडे कशासाठी ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात करोनाच्या साथीमुळे आर्थिक स्थिती बिकट असतानाही जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना सुमारे दरमहा पाच कोटी रुपयांचे घर भाडे अदा करण्यात येत आहे.

त्यामुळे या घर भाड्याचा हिशोब द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आली. राज्य सरकार अन्य योजना आणि विकास कामांना कात्री लावत असतांना शिक्षकांच्या घर भाडे याला कात्री का लावत नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिक्षण समितीची मासिक बैठक झाली. यावेळी शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालासह अन्य विषयांवर चर्चा झाली.

त्यानंतर शिक्षकांच्या घरभाडे हा विषय समोर आला. यात जिल्ह्यात सध्या 11 हजार 500 च्या सुमारास प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपयांचे घर भाडे दरमहा अदा करण्यात येत आहे.

संबंधित शिक्षक ज्या गावात कार्यरत आहेत त्या गावात ते राहत असल्याच्या दाखल्याच्या आधारे त्यांना घरभाडे अदा करण्यात येते.

विशेष म्हणजे हे शिक्षक नेमणुकीच्या गावात राहत असतील अथवा नसतील तरी हे घर भाडे अदा करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक गावात राहतात का हेही तपासावे, दुसरीकडे एकाच शाळेवर दोघे पती-पत्नी दांपत्य शिक्षक कार्यरत असतील तर त्यांना स्वतंत्रपणे घर भाडे अदा करण्यात येते का? याची माहिती द्यावी, अशी माहिती सदस्य राजेश परजणे यांनी सभेत विचारली. मात्र पदाधिकारी आणि अधिकारी यांनी त्यांना पुढील बैठकीत याची माहिती देणार असल्याचे सांगितले.

अन्यया विरोधात दाद मागणार ?

राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शुन्य ते शंभर हेक्टवरील बंधार्‍यांची कामे आणि त्याची ना हरकतीचे अधिकार जिल्हा परिषदेकडून काढून घेतले आहेत. मागील पदाधिकारी आणि सदस्य मंडळाने या निर्णयाविरोधात दाद मागून हे अधिकार पुन्हा मिळविले होते. यंदरा जिल्हा परिषदेचे विद्यमान पदाधिकारी या अधिकाराासाठी लढणार की गप्प बसणार असा सवाल सदस्यांमधून उपस्थित होत आहे.

शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षकांच्या घरभाड्याबाबत विचारणा केली. यावेळी जिल्हा परिषद यासाठी दरमहा सुमारे 4 कोटी 50 लाख ते पाच कोटी रुपये खर्च करत असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, याचा तपशील पुढील मासिक बैठकीत देणार असल्याचे सांगण्यात आले.

- राजेश परजणे, शिक्षण समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com