अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेत सहा महिन्यांनंतर पुन्हा करोनाचा शिरकाव झालेला आहे. याठिकाणी कार्यरत असणार्या एका विभागातील अधिकारी

तर दुसर्या दोन विभागातील चार कर्मचार्यांचे करोनाचे अहवाल बाधित आढळून आलेले आहेत. आधीच जिल्हा परिषदेच्या दोन सदस्य, एक अधिकारी आणि काही कर्मचार्यांचा करोनामध्ये बळी गेला असून त्यात पुन्हा करोनाचा याठिकाणी शिरकाव झाल्याने घबराट निर्माण झाली आहे.

जिल्ह्यासह राज्यात करोना प्रभाव वाढत आहे. त्यात 21 तारखेला एमपीएसपीची परीक्षा होणार असून त्यापार्श्वभूमीवर परीक्षेत पर्यवेक्षण करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. याचाचणी दरम्यान जिल्हा परिषदेत नव्याने पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. करोना बाधितांना एका विभागाचे प्रमुख अधिकारी यासह अन्य चार कर्मचार्यांचा समावेश आहे.

या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज काही कर्मचार्यांच्या चाचणीचे अहवाल येणार असून त्यात आणखी किती बाधित आढळणार याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष आहे.

येत्या 26 तारखेला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. बाधित अधिकारी हा अर्थसंकल्पाशी निगिड असल्याने आता अर्थसंकल्प तयार करण्यापासून तो सादर करण्याचे सर्व सोपसस्कार अन्य अधिकार्यांना करावे लागणार आहे.

लवकरच 50 टक्के उपस्थितीचे आदेश

करोनाचे वाढते संक्रमण पाहता जिल्हा परिषदेत लवकरच आलटून पालटून 50 कर्मचार्यांची उपस्थितीचे आदेश काढण्यात येणार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी सामान्य प्रशासन विभागाला सुचना दिल्याचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे जिल्हा परिषत पुन्हा 50 टक्के उपस्थितीत कामकाज होणार आहे.