झेडपी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन करणार

अरुण जोर्वेकर : औरंगाबाद येथे संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक
झेडपी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना 
प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचार्‍यांची वेतन त्रुटी, सर्वसाधारण बदल्यांचे शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकांच्या अडीअडचणी सोडवणे, जिल्हा स्तरावर लिपिकांना शासनाकडून आदर्श पुरस्कार देणे, शिक्षण लिपिकांची पदे वाढविणे, 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना एक जुलैची वेतनवाढ देण्याबाबत व इतर प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने राज्यभर ऑगस्ट 2022 रोजी लक्षवेधी आंदोलन करणार असून प्रश्न निकाली न निघाल्यास 1 सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असे निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव अरूण जोर्वेकर यांनी सांगितले.

राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना 615 ची राज्य कार्यकारिणी बैठक औरंगाबाद येथे झाली. बैठकीस 23 जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील लिपिकांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे लिपिकांचे पदोन्नतीचे स्तर कमी करून लिपिकांना महसूल विभागात प्रमाणे पदोन्नतीचे स्तर लागू करण्याबाबत शासन निर्णय निघाला आहे.

त्यानुसार शासनास प्रस्ताव देण्याचे ठरविण्यात आले. तसेच संघटनेचे राज्य अधिवेशन सप्टेंबर 2022 मध्ये घेण्याचे निश्चित झाले आहे. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर, मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, राज्य सचिव अरूण जोर्वेकर, कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष पंकज गुल्हाने, राज्य समन्वयक सागर बाबर, कार्याध्यक्ष सचिन मगर, मंत्रालय संपर्कप्रमुख प्रकाश महाळुंगे, राज्य कार्यकारिणी सदस्य नागेश सांगळे, कैलास डावरे, जिल्हाध्यक्ष भरत घुगे, कोषाध्यक्ष, चेतन चव्हाण, निलेश डुकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com