जिल्हा परिषदेचा गाडा ठप्प

कर्मचार्‍यांची आदलून-बदलून अवघी 15 टक्के उपस्थिती
जिल्हा परिषदेचा गाडा ठप्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची यंत्रणा असणार्‍या जिल्हा परिषदेच्या कामकाजावर करोनाचा मोठा परिणाम झालेला आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा गाडाच ठप्प झाला असून पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्य विभाग, पशूसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करतांना अडचणी येत आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशानूसार जिल्हा परिषदेत सध्या अवघी 15 टक्के कर्मचार्‍यांची हजेरी असून अभ्यांगतांना या ठिकाणी प्रवेश नसल्याने सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सन्नाटा आहे. जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभागाला ग्रामीण भागात साथजन्य रोगांचा फैलाव होवून नयेत, नदी काठवरील गावातील आरोग्य विषयक उपाययोजना, डेंगी, हिवताप, पावसाळ्यात निर्माण होणारे जलजन्य आजार निमुर्लन कार्यक्रमाची पूर्व तयारी करावी लागते.

यासह पशूसंवर्धन विभागाला जिल्ह्यातील पशूधनाचे विविध लसीकरण, पावसाळ्यात जनावरांना उद्भावणारे आजारांचे निमुर्लन कार्यक्रमाची तयारी करावी लागते. यासह कृषी विभागाकडे खरीप हंगामाच्या नियोजन खते, बियाणे, किटक नाशकांचा पुरवठा आणि उपायोजना कराव्या लागतात.

मात्र, करोनामुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन, कर्मचार्‍यांची अवघी 15 टक्के उपस्थिती यांचा परिणाम पावसाळ्या पूर्वी करण्यात येणार्‍या उपाययोजनांवर होतांना दिसत आहे.

पदाधिकारी, सदस्य लॉकडाऊन

जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य हे करोनामुळे त्यांच्या गावात आणि जिल्हा परिषद गटात अडकून पडलेले आहेत. जिल्हा परिषदेत कर्मचारी आणि अधिकार्‍यांना करोनाचे काम असल्याने त्यांची उपस्थिती नगण्य असल्याने पदाधिकारी सदस्य जिल्हा परिषदेत येवून उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com