मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर हजर

मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर हजर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आयएएसच्या दीड महिन्यांच्या प्रशिक्षणावर गेलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर सोमवारी नगरला पुन्हा हजर झाले आहेत. दीड महिन्यांचे प्रशिक्षण करोना संसर्गामुळे अवघ्या एक महिन्यांत संपविण्यात आल्याने क्षीरसागर नगरला परतले आहेत.

5 एप्रिलाला क्षीरसागर हे मसुरीला आयएएसच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. या दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर हे नगर जिल्हा परिषदेत रुजू झाले असून त्यांच्याकडे नियमित चार्ज सोपविण्यात आला आहे. वाढत्या करोना संसर्गामुळे यावर्षीच्या मसुरी प्रशिक्षणादरम्यान देशाबाहेरी आणि देशातंर्गातील 15 दिवसांचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com