वसंतराव नाईकांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार

वसंतराव नाईकांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार

राजश्री घुले : कृषिदिनी उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान, कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कै. वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वांत जास्त काळ काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात कृषी विधायक धोरण (Agricultural constructive policy), महिला शेतकर्‍यांचे सक्षमीकरण (Empowerment of women farmers) व विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी त्यांनी बहुमोल योगदान दिले. राज्याला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दूरदृष्टी असलेले कै. नाईक यांची जयंती कृषिदिन (Agriculture Day) म्हणून साजरी केली जाते. कै. नाईक यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले आहे, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा राजश्री घुले (ZP President Rajshree Ghule) यांनी केले.

कृषी विभाग ( Department of Agriculture), जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना (District Farmer) उत्कृष्ट शेतकरी पुुरस्कार (Farmer Award) अध्यक्षा घुले यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सभापती काशिनाथ दाते, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक विलास नलगे, कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, तंत्र अधिकारी अशोक डमाळे, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, प्रवीण गोरे, कौस्तुभ कराळे, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते. यावेळी कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप करण्यात आला.

सभापती काशिनाथ दाते म्हणाले, कै. नाईक यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कृषीविषयक धोरण योजना (Agricultural Policy Plan) मोठ्या प्रमाणात राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्याचा चांगला परिणाम झाला. महाराष्ट्र अन्नधान्य उत्पन्नात (Maharashtra in foodgrain production) स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कृषी विभाग आत्माअंतर्गत नाथा देशमुख, सतीश पालवे, नवनाथ सायकर, अविनाश लहाणे, संजय वागस्कर, रामेश्वर जगताप, ताराचंद गागरे, बाळासाहेब खरात, शांताराम बारामते, सौ. मीनाक्षी निर्मल यांना व कृषी विभागाच्या वतीने भानुदास थोरात, पांडुरंग कर्डिले, बबन पागिरे, हरिभाऊ म्हस्के, देवीदास खाटिक, कृष्णा परदेशी, धनराज पवार, आबासाहेब वावरे, महेश म्हस्के या शेतकर्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतिलाल ढवळे यांनी केले, तर आभार सुनीलकुमार राठी यांनी मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com