झेडपी शिक्षकांच्या बदल्यांसाठी मोबाईल अ‍ॅपमध्ये 31 दुरुस्त्या

झेडपी शिक्षकांच्या बदल्यांसाठी मोबाईल अ‍ॅपमध्ये 31 दुरुस्त्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी विकसित करण्यात येत असलेल्या मोबाईल अ‍ॅपमधील मसुद्यात राज्य सरकारने तब्बल 31 दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार या अ‍ॅपसाठीच्या मसुद्यात (डेटा) समाविष्ट करण्यात आलेली जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या, सुगम व दुर्गम शाळांची नावे, सर्व शिक्षकांची प्राथमिक माहिती, आधार आणि पॅन कार्ड क्रमांकाची पुनर्रपडताळणी करावी लागणार आहे. शिवाय राज्य सरकारने मोबाईल पद्वारे केल्या जाणार्‍या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी एक शिक्षक, एक मोबाईल नंबर अनिवार्य केला आहे.

राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केले आहे. नवीन बदली धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी खास अ‍ॅप विकसित केले जात आहे. हे अ‍ॅप मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत. या मोबाईल अ‍ॅपच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना दिला होता. या आदेशानुसार या दोन्ही सीईओंनी या पच्या प्रगतीचा आढावा घेतला.

ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी या मसुद्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी या मसुद्यात 31 दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला. या बैठकीला ग्रामविकास विभागातील उपसचिव का. गो. वळवी, प्रवीण जैन हेही उपस्थित होते.

आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याचे काम सुरू केले असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे.

सुचविलेल्या प्रमुख दुरुस्त्या

- शाळांची नावे, पत्ते, तालुक्यांची खात्री करा

- प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र युडायस क्रमांक द्या

- शिक्षकांची जिल्हानिहाय संख्या, शालार्थ आयडी तपासणे

- आधार आणि पॅन क्रमांक शिक्षकांचाच असल्याची खातरजमा करणे

- प्रत्येक शिक्षकांसाठी स्वतंत्र मोबाईल नंबर जोडून घेणे

- शिक्षकांचा प्रकार (उदा. उपशिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक) नमूद करणे

- सुगम-दुर्गम शाळांच्या अटींची पूर्ततेची पडताळणी करणे

- प्रत्येक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक अपलोड करणे

- संचमान्यतेनुसार रिक्त ठेवण्यात येणारी शिक्षकांची पदे निश्चित करून जाहीर करा

- विनंती बदल्यांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा

- आंतरजिल्हा बदलीची नियमावली जाहीर करणे

- अनुकंपा तत्त्वावरील शिक्षक भरती, पदोन्नती, पदावनती आणि स्वेच्छानिवृत्तीबाबतचा निर्णय घेऊन, त्याबाबतचा आदेश काढणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com