संवर्ग चारमधून बदलीसाठी 1 हजार 44 गुरूजींचे अर्ज

तिघांनी ऑनलाईन अर्ज न भरल्याचे ते विस्तापित राऊंडमध्ये
संवर्ग चारमधून बदलीसाठी 1 हजार 44 गुरूजींचे अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आता अंतिम टप्प्यात आहेत. शेवटचा असणार्‍या संवर्ग चारमधून बदलीसाठी पात्र असणार्‍या 1 हजार 44 जणांनी ऑनलाईन बदलीचा अर्ज केला आहे. या संवर्गात बदलीपात्र असणार्‍या शिक्षकांची संख्या 1 हजार 47 होती. मात्र, तिघांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज न केल्याने ते आता थेट विस्तापित राऊंडमध्ये पोहचले आहे. दरम्यान, लवकरच या संवर्गातील बदल्याची प्रक्रिया पूर्ण होवून गुरूजीच्या बदलीचा विषय संपणार आहे.

कोविड संसर्गाचे दोन वर्षे आणि तिसरे वर्षे ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर 2022 पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत संवर्ग एक ते तीन यातील बदली पात्र 662 गुरूजीची बदली झालेल्या आहेत. आता संवर्ग चार ज्यात सर्वाधिक शिक्षकांची संख्या असून या शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. या संवर्गात मोडणारे प्राथमिक शिक्षक हे एकल शिक्षक असून बदलीसाठी कोणत्याच प्राधान्यक्रमांत न बसणारे अवघड क्षेत्रात काम न केलेल्या शिक्षकांचा या संवर्गात समावेश आहे.

जिल्ह्यात संवर्ग चारच्या बदल्याची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र हजार 47 शिक्षकापैकी 1 हजार 44 शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे. तिघा शिक्षकांनी अर्ज केलेला नसल्याने आता थेट विस्तापितांच्या राऊंडमध्ये फेकले गेले असून त्यांची बदल्यामध्ये मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान आतापर्यत तिन संवर्गातील 662 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून संवर्ग चारमध्ये 700 ते 800 शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. यामुळे यंदा दोन वर्षात 1 हजार ते 1 हजार 200 शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यापूर्वी हे प्रमाण 500 च्या आत होते. तिन वर्षातनंतर बदल्या होत असल्याने यंदा शिक्षकांच्या बदल्यांचा आकडा चांगलाच वाढणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com