
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
1 ऑक्टोबर...रविवार सुट्टीचा दिवस...(Sunday Holiday) दुसरीकडे महाश्रमानाच्या तयारीची लगबग...त्यातच अचानक सकाळी सकाळी 9 वाजता पगार (Salary) खात्यावर वर्ग झाल्याचा मेसेज येतो आणि जिल्ह्यातील 12 हजार शिक्षकांच्या (Teacher) चेहर्यावर आनंद झळकले. तीन वर्षानंतर पहिल्यांदा महिन्यांच्या पहिल्याच दिवशी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी 9 वाजता पगार झाल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आनंद गगनात मावेनसा झाला आहे.
शासकीय, खासगी कर्मचार्यांना नेहमीच पगार (Salary) वेळेवर व एक तारखेला व्हावे, अशी अपेक्षा असते. मात्र, अनेक वेळा यात अडचणी येत असतात. पगार वेळेत व्हावेत, या आनंदाला तीन वर्षापासून प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) या मुकले होते. कधीकधी तर महिनामहिना पगार लेट होत होते. याबाबत शिक्षक संघटनांकडून जिल्हा परिषद प्रशासनाला (Zilla Parishad Administration) वेळोवेळी निवेदन देण्यात येवून तक्रार करण्यात येत होती. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (CEO Ashish Yerekar) यांनी या विषयात लक्ष घातले.
तसेच शिक्षकांचे पगार वेळेत करण्याच्या सुचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांना दिल्या. त्यानूसार मोरे यांनी यांची त्यांच्या टीमला रूपरेषा देवून देत, शिक्षकांच्या पगाराचे नियोजन करण्याचे आदेश दिले. त्याचे फलित म्हणूलन महिन्यांच्या एक तारखेला रविवार सुट्टी असतांनाही जवळपास बारा हजार शिक्षकांचे सप्टेंबर महिन्यांचा पगार ऑक्टोबर महिन्यांच्या पहिल्याच दिवशी झाला आहे. एक तारखेला सकाळी पगार झाल्याचा मेसेज आल्याने गुरूजींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या कामात उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडझोडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झेडपी एफएमएसचे राज्य समनवयक राजेंद्र डोंगरे यांच्या तांत्रिक सहकार्याने अमोल राऊत, तंत्रस्नेही योगेश पंधारे, उमाकांत भांड, महंमद शेख यांच्या टीमने शिक्षकांचे पगार एक तारेखला करण्याची किमया साधली आहे.