गुरूजीचे अल्पवयीन विद्यार्थींनी सोबत अश्लील चाळे

जिल्ह्यात कुठे घडली घटना?
गुरूजीचे अल्पवयीन विद्यार्थींनी सोबत अश्लील चाळे

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (Zilla Parishad Primary School) शिक्षकाने (Teacher) पाच ते सहा अल्पवयीन विद्यार्थींनी (Minor students) सोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. एका विद्यार्थींनीच्या पालकाने फिर्याद दिली आहे.

संतोष एकनाथ माघाडे (वय 34 रा. गंगापूर जि. औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक (Arrested) केली आहे. तो नगर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेचा शिक्षक (Primary School Teacher) आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप (Assistant Inspector Rajendra Sanap) यांनी दिली. सध्या करोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षण (Online learning) सुरू आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी (Online learning) प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश आहे. शाळेतून ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देतात. शिक्षक संतोष माघाडे हा ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थींनीना शाळेत बोलून घेत असे व त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थींनी घरी हा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सानप करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com