गट, गण साठी 8 जूनपर्यंत हरकती

गट, गण साठी 8 जूनपर्यंत हरकती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण रचनेची प्रारूप अधिसूचना आज, 2 जून रोजी प्रसिध्द होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांच्या काही हरकती व सूचना असल्यास त्यांनी 8 जून 2022 पर्यंत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com