जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य संख्या वाढविण्यास मान्यता

नगर जिल्ह्यातील गट-गण वाढण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य संख्या वाढविण्यास मान्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील निवडून येणार्‍या सदस्यांची कमाल आणि किमान संख्या निश्चित करणारे विधेयक काल विधानसभेत फारशा चर्चेविना मंजूर झाले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हे विधेयक मांडले.

हे विधेयक मंजूर झाल्याने नगर जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांची संख्या तसेच सदस्य वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर जिल्ह्यात सध्या 73 गट आणि 146 गणांची संख्या आहे. त्यात आता आगामी निवडणुकीत 85 गट आणि 170 गणांची संख्या वाढणार आहे. पर्यायाने सदस्य संख्याही या प्रमाणात वाढणार आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत निवडून येणार्‍या सदस्यांची संख्या 227 वरून 236 इतकी करण्यास विधानसभेने मंगळवारी मान्यता दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com