झेडपीला बदल्यांच्या प्रक्रियेसाठी ग्रामविकासच्या आदेशाची प्रतिक्षा!

अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द : समुपदेशाची प्रक्रिया बाकी
झेडपीला बदल्यांच्या प्रक्रियेसाठी 
ग्रामविकासच्या आदेशाची प्रतिक्षा!
झेडपी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात करोना रुग्णांची (state Covid 19 Patient) संख्या कमी झालेली असली तरी करोना संसर्ग कायम (Covid 19 infection persists) आहे. त्यामुळे आगामी काळात करोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने प्रशासकीय बदल्यांना (Administrative transfers by the state government) केवळ 14 ऑगस्टपर्यंत परवानगी दिली आहे. यात केवळ विहित कालावधी पूर्ण झालेल्या 15 टक्के मर्यादित सर्वसाधारण बदल्या करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासनाने काढले असले, तरी जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती (Panchayat Samiti) कर्मचार्‍यांच्या बदल्यासाठी ग्रामविकास विभागाच्या स्वतंत्र आदेशाची जिल्हा परिषदेला प्रतिक्षा (Zilla Parishad waits) आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दीड महिन्यांपूर्वीच 31 मार्च 2021 अर्हता दिनांक निश्‍चित करून बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करून त्यावर हरकती घेवून बदली पात्र कर्मचार्‍यांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करून ठेवलेली आहे. ग्रामविकास विभागाचे आदेश (Orders of Rural Development Department) येताच जिल्हा परिषद बदल्यासाठी समुपदेशनाची प्रक्रिया राबविण्याच्या तयारीत आहे.

राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्याबाबत दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने काढलेल्या आदेशात सद्यस्थितीत महाराष्ट्र हे करोनाबाधित राज्य आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित करण्यात येत आहे. सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 15 टक्के एवढ्या मर्यादेत बदली अधिनियमातील कलम 6 अन्वये सक्षम प्राधिकार्याच्या मान्यतेने कराव्यात. ज्या अधिकारी आणि कर्मचार्यांचा संबंधित पदावर कार्यकाळ पूर्ण झालाय अशाच बदल्या कराव्यात.

या बदल्यांची कार्यवाही 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. यानंतर जी पदं रिक्त राहतील त्या पदांवर विशेष कारणास्तव बदल्या करण्यास 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या काळात परवानगी राहणार आहे. मात्र, पंचायत राज्य व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यासाठी ग्रामविकास विभागाच्या स्वतंत्र आदेशाची गरज आहे. ग्रामविकास विभागाने याबाबत स्पष्ट काढल्यानंतर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदलीचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला बदल्यासाठी ग्रामविकास विभागाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.

जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सध्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वार वाहत असून सोईच्या बदल्यासाठी आतापासून फिल्डींग लावण्यात येत आहे. कोविड पूर्वी कर्मचार्‍यांची 10 टक्के विनंती आणि 10 विनंती अशा 20 टक्के बदल्या करण्यात येत होत्या. मात्र, आता हे प्रमाण 15 टक्के करण्यात आले असून ग्रामविकास विभाग हे प्रमाण किती ठेवणार यावर जिल्हा परिषद बदल्याची स्थिती अवलंबून राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com