झेडपी सदस्य विरूध्द आमदार वाद रंगणार

नियोजनच्या निधीवरून सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा || न्यायालयात जाण्याबाबत लवकरच निर्णय
झेडपी सदस्य विरूध्द आमदार वाद रंगणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा नियोजन समितीचा निधी, लेखाशिर्ष 50-54, विशेष गट ब आणि अन्य योजनांचा जिल्हा परिषदेच्या वाट्याच्या निधीवर आमदार हात साफ करत आहेत. नियोजन समितीत जिल्हा परिषद सदस्यांचे बहुमत असताना त्यांचाच निधी कपात करून तो आमदारांना देण्यात येत आहे. या विरोधात सोमवारी जिल्हा परिषद सदस्य एकत्र येऊन निर्णय घेणार आहेत. तसेच वेळप्रसंगी नियोजनच्या निधीसाठी न्यायालयात धाव घेण्याबाबत वादळी चर्चा जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत झाली.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली काल झेडपीची सर्वसाधारण सभा झाली. सभेत सदस्य राजेश परजणे यांनी हा विषय उपस्थित केला. नियोजन समिती आमदारांना निधी देते आणि सदस्यांच्या निधीला कात्री लावते, असे परजणे यांनी सांगितले. त्यावर बांधकाम सभापती काशिनाथ दाते यांनी नियोजन समितीच्या निधीचा 60-40 रेषो ठरलेला असताना जिल्हा नियोजन अधिकारी यांनी हा रेषो 55-45 करण्यात आल्याचे असल्याचे सभागृहाला सांगितले. त्यावर सदस्य शरद नवले यांनी हा रेषो परस्पर कधी बदला याबाबत विचारणा केली. अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी गट ब चा एक रुपयाही सदस्यांना दिला नाही. 25-54 चा निधीत आमदार वाटणी मागतात. त्यावर सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी निधीसाठी न्यायालयात जाण्याची सुचना केली.

दरम्यान, अध्यक्षा घुले यांनी पाच टक्के निधी हा खासदार यांना देण्यात येणार असल्याचे नियोजन समितीकडून सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर सभापती गडाख यांनी निधीचा रेषो बदलण्याचा ठराव नियोजन समितीला घेता येत नाही. रेषो ठरविण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. सदस्य नवले यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या विरोधात न्यायालयचा अवमान केल्या प्रकरणी खटला दाखल करण्याची मागणी केली. नियोजन समितीचा निधी कपात न होवून देणे ही पदाधिकार्‍यांची आहे. या विषयावर परजणे, संदेश कार्ले, हर्षदा काकडे आक्रमक होत्या.

कार्ले यांनी नियोजन समितीमधील 40 टक्के निधी आमदारांना देतो हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र, ते सदस्यांचा निधी कापत असतील तर ते चुकीचे आहे. 25-15 आणि गट ब चा निधी हा सदस्यांचा असल्याचे सभापती दाते यांनी सांगितले. यामुळे या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी कार्ले यांनी केली. अध्यक्षा घुले यांनी याप्रकरणी पालकमंत्री यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. त्यावर कार्ले यांनी पालकमंत्री यांनी सदस्यांच्या हक्कावर गदा आणू नये, अशी मागणी केली. सभापती उमेश परहर, माधवराव लामखेड या विषयावर आक्रमक होते. अखरे नियोजनच्या विषयावर सोमवारी सदस्यांनी एकत्र येवून पुढील निर्णय घेण्याची सुचना सभापती सुनील गडाख केली आणि विषयावर पदडा पडला. मात्र, नियोजन समितीच्या विषयावर जिल्हा परिषद सदस्य आक्रमक असल्याचे दिसून आले.

आमदारांची कामे होल्डवर

आमदारांनी मंजूरी केलेली अनेक कामांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येते. अशी बरीच कामे कालच्या सभेत मंजुरीसाठी होती. या कामांना मंजूरी न ती होल्डवर ठेवण्याची सुचना परजणे यांनी केली. त्यानूसार सभागृहाने त्यास मान्यता दिली.

आमच्या ऐवजी तुमचे नाव द्या

जिल्हा नियोजन समितीच्या निधीसाठी न्यायालयात जाण्याच्या ठरावाला सुचक आणि अनुमोदक म्हणून परजणे आणि माझे नावे देण्याऐवजी अध्यक्षा घुले यांनी सदस्य अजय फटांगरे आणि अन्य सदस्याचे नावे देण्याची विनंती सदस्य शरद नवले यांनी करताच एकच हश्या पिकला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com