पशुपालकांशी असलेली बांधिलकी कायम ठेवावी

सुनिल गडाख || जिल्हा परिषदेतील सहा पशुधन विकास अधिकार्‍यांना पदोन्नती
पशुपालकांशी असलेली बांधिलकी कायम ठेवावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आपण शेतकर्‍यांची मुले आहोत, नंतर अधिकारी आहोत हे विसरु नये. शासनाच्या विविध योजना राबविताना पशुपालक शेतकर्याला केंद्रस्थानी ठेवावे. आपल्या ज्ञानाचा उपयोग पशुपालकांना जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने होईल, असे प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी केले.

नगर जिल्हा परिषदेतील सहा पशुधन विकास अधिकार्‍यांना सहायक आयुक्त पशुसंवर्धनपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार सभापती गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती गडाख म्हणाले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धनपदी बढती मिळाल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. पण पदोन्नती झाली तरी अधिकार्‍यांनी पशुपालक शेतकर्‍यांशी असलेली बांधिलकी कायम जपावी, असे आवाहन केले.

पदोन्नती मिळालेले डॉ. सोपानराव नांदे, डॉ.अरूण हरिश्चंद्रे, डॉ. पोखरकर, डॉ. दशरथ दिघे, डॉ.प्रकाश आहेर, डॉ. अनंत साखरे यांचा सत्कार सभापती गडाख यांनी केला. या कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुकुंद राजळे यांच्यासह जिल्ह्यातील सहायक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com