अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोक्याच्या ठिकाणी अनेक जागा आहेत. या जागा बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर

विकसित करण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या जागा जिल्हा परिषदेत भाडेतत्त्वर देणार आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कोट्यावधी रुपयांच्या जागा वाचणार असून याबाबत बुधवारी जिल्हा परिषद पदाधिकारी अधिकारी यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, सभापती काशिनाथ दाते, उमेश परहर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सर्व खातेप्रमुख यांच्या पूर्व तयारीची बैठक झाली.

यावेळी जिल्हा परिषदेची सभा ऑनलाईन होणार असल्याने सर्व विषयांना मंजूरी देवून जास्ती जास्त निधी कसा खर्च करता येईल, याबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काही ठिकाणच्या जागा बीओटी तत्त्वर विकासीत करण्यात करण्याचा विषय आहे. याबाबत चर्चा करतांना जिल्हा परिषद पदाधिकार्यांनी स्पष्ट केली की, बीओटीमुळे जिल्हा परिषदेचा लाखो रुपयांचा भूखंड विकासाच्या घशात जातो. त्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या जागा जिल्हा परिषदेने भोडतत्त्वर दिल्यास या कोट्यावधी रुपयांच्या जागांची मालकी जिल्हा परिषदेकडे राहिल आणि भाडे करारापोटी उत्पन्नही मिळले. यामुळे या पुढे जिल्हा परिषदेच्या जागांचा बीओटीचा विषय संपविण्यात आला आहे.

सर्वसाधारण सभा ऑनलाईनच !

तब्बल वर्षभरानंतर जिल्हा परिषदेची उद्या (दि.26) होणारी सभा ऑनलाइन होणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांनी सभेच्या कामकाजात बदल करत ही सभा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.आधी ही सर्वसाधारण सभा 26 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी एक वाजता होणार होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत होणारी सभा आता व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाणार आहे. तसे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष घुले व सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. काही सदस्यांनी या निर्णयास तीव्र विरोध केल्यानंतरही ही सभा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.