आणखी 17 हरकती वाढल्या

गट-गण प्रारूप रचना : आज शेवटचा दिवस
आणखी 17 हरकती वाढल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर मंगळवार (दि.7) रोजी 23 हरकती आल्या आहेत. यात कालच्या 17 हरकतींचा समावेश असून आज (बुधवारी) गट आणि गणाच्या प्रारूप रचनेवर हरकत घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती हरकती दाखल होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या 85 गट आणि 170 गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. या रचनेवर सोमवार (दि.6) रोजी सहा हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकती अकोले आणि राहुरी तालुक्यातील होत्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात महसूल उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व जिल्हा पुर्नवसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या निगराणीत हरकती नोंदवून घेतल्या जात आहेत.

प्राप्त होणर्‍या हरकतींचा अहवाल त्याच दिवशी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला जात आहे. हरकती दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्याने हरकती दाखल होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाला आहे. त्यानंतर गुरूवार (दि.9) पासून विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त यांच्या समोर दाखल हरकतींवर सुनावणी होवून त्या निकाली काढण्यात येणार आहेत.

17 हरकतींची भर

काल मंगळवारी 17 हरकतींची भर पडली असून यात डॉ. दिलीप पवार, रामदास भोर, अनिल खेडकर, नितीन औताडे, आझाद ठुबे, सुधीर वैरागर (रा. घोडेगाव, ता. नेवासे), विष्षू काकडे (रा. पाथर्डी), कचरू भालदंड व इतर (रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर), मधुकर गागरे (रा. कानडगाव, ता. राहुरी), लहानू सदगीर (रा. मुठाळणे, ता. अकोले), सरपंच ग्रामपंचायत विळद (ता. नगर), सुरेश खोसे व इतर (रा. कवडगाव, जामखेड), संदीप ठोंबरे व इतर (रा. धांदरफळ, ता. संमगनेर), सादिक शिलेदर (रा. नेवासा खुर्द, ता. नेवासे), हनुमंत उतेकर (रा. शिऊर, ता. जामखेड), अ‍ॅड. सुभाष जायभाय (रा. जायभायवाडी, ता. जामखेड), सुधीर वैरागर यांनी गट व गणांच्या प्रारूप रचनेवर विरुध्द हरकत दाखल केली आहे. तर इतरांनी आपल्या गावासंदर्भातील गट वगणाच्या विरुध्द हरकत दाखल केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com