पहिल्याच दिवशी झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे शतक

पहिल्याच दिवशी झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे शतक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेला सुरूवात झाली असून मंगळवारी पहिल्याच दिवसी आठ विभागातील 104 कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे दिवसभर बदल्यांची प्रक्रियेत सहभागी झाले.

जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर यांनी बदल्याची प्रक्रिया पार पाडली. सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती सभागृहात बदल्याची प्रक्रिया सुरू झाली. यात सर्व प्रथम अर्थ विभागातील सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक लेखा आणि कनिष्ठ सहायक लेखा यांच्या प्रत्येकी 1 प्रशासकीय, कनिष्ठ सहायक आणि वरिष्ठ सहायक यांची प्रतेकी 1 विनंती बदल्या करण्यात आल्या.

सामान्या प्रशासन विभागात सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक यांच्या प्रत्येकी 1 प्रशासकीय आणि कनिष्ठ सहायकांच्या 6 प्रशासकीय प्रशासन अधिकारी यांची 1 विनंती, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांची 1 विनंती, वरिष्ठ सहायकांच्या 7, कनिष्ठ सहायकांच्या 21, तर वरिष्ठ सहायकांच्या 3 आपसी, कनिष्ठ सहायकांच्या 8 आपसी या विभागातील 51 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. कृषी विभागातील कृषी अधिकारी 1 प्रशासकीय, 1 विनंती, विस्तार अधिकारी यांची 1 प्रशासकीय आणि 2 विनंती बदल्या करण्यात आल्या.

महिला बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिकांची 2 प्रशासकीय आणि 6 विनंती तर एक आपसी बदल्या करण्यात आल्या तर 1 आपसी. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ शाखा अभियंता 1 प्रशासकीय आणि 1 विनंती, लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ शाखा अभियंता स्थापत्य 1 प्रशासकीय आणि 1 विनंती. बांधकाम (उत्तर) विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 1 प्रशासकीय आणि 3 विनंती, कनिष्ठ अभियंता यांची 2 प्रशासकीय आणि 3 विनंती, तर 4 आपासी, पशुसंवर्धन विभागातील सहायक पशुधन विकास अधिकारी 1 प्रशासकीय, पशुधन पर्यवेक्षक 1 प्रशासकीय आणि 15 विनंती बदल्या करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com