झेडपी सोसायटीच्या अध्यक्षपदी कडूस, उपाध्यक्ष काळापहाड

झेडपी सोसायटीच्या अध्यक्षपदी कडूस, उपाध्यक्ष काळापहाड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या (Zilla Parishad Employees Society) चेअरमनपदी संजय कडूस (Chairman Sanjay Kadus) यांची तर व्हाईस चेअरमनपदी अशोक काळापहाड (Vice Chairman Ashok Kalapahad) यांची निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय आहेर (District Deputy Registrar Co-operative Society Digvijay Aher) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.

चेअरमनपदासाठी कडूस (Chairman Sanjay Kadus) यांच्या नावाची सूचना शशिकांत रासकर यांनी मांडली त्यास वालचंद ढवळे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी काळापहाड (Vice Chairman Ashok Kalapahad) यांच्या नावाची सूचना मोहन जायभाये यांनी मांडली, त्यास सुभाष कराळे यांनी अनुमोदन दिले. निवड प्रक्रियेवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक व्हि. के. मुटकुळे, संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार व उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांनी सहकार्य केले. या निवडीनंतर बोलताना चेअरमन कडूस (Chairman Sanjay Kadus) म्हणाले, सोसायटीच्या संचालक मंडळाने पुन्हा एकदा चेअरमनपदासाठी संधी देवून मोठा विश्वास दाखविला आहे. चांगल्या कामाची ही पोचपावती आहे. पाच वर्षात जवळपास सर्व आश्वासने पूर्ण करून सभासद हिताचा कारभार केला आहे. संस्था व सभासद हितासाठी आम्ही कायम कटिबध्द असून येत्या काळातही असेच निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील.

व्हाईस चेअरमन काळापहाड (Vice Chairman Ashok Kalapahad) म्हणाले, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी (Zilla Parishad Employees Society) सभासदांसाठी कामधेनू आहे. संस्थेचा कारभार करतांना सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. यापूर्वीही या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा सर्वांनी विश्वास प्रकट केला असून संस्थेची घोडदौड आगामी काळातही कायम राखण्याचा प्रयत्न करू. यावेळी संचालक अरूण जोर्वेकर, प्रताप गांगर्डे, भरत घुगे, सुभाष कराळे, संतोष नलगे, सोपान हरदास, संजू चौधरी, अरूण शिरसाठ, विलास वाघ, ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, नारायण बोराडे, इंदू गोडसे, उषा देशमुख, शशिकांत रासकर, बाबासाहेब पंडीत, सभासद आबासाहेब घोडके, भाऊसाहेब कुर्हे, श्रीकांत भगत, शांतीलाल डोभाळ, चंद्रकांत वाघचौरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com