झेडपी कर्मचार्‍यांच्या मंगळवारपासून ‘झुम’वर ऑनलाईन बदल्या !

वेळापत्रकातही बदल : आरोग्य विभागाच्या दोन स्वतंत्र दिवशी होणार बदल्या
झेडपी कर्मचार्‍यांच्या मंगळवारपासून 
‘झुम’वर ऑनलाईन बदल्या !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्याच्या अर्थ विभागाने (State Finance Department) सरकारी कर्मचार्‍याच्या बदल्यांचे आदेश (Orders for transfer of government employees) दिल्यानंतर ग्रामविकास विभागानेही जिल्हा परिषद (Zilla Parishad) कर्मचार्‍यांच्या बदल्यास करण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यानूसार मंगळवार (दि.20) आजपासून जिल्हा परिषद (Zilla Parishad) कर्मचार्‍यांच्या ऑनलाईन झुम ऑपव्दारे बदल्या होणार (Transfers online zoom app for employees) आहेत. यामुळे पहिल्यांदा बदली पात्र कर्मचार्‍यांना मुख्यालयात येण्याऐवजी पंचायत समितीत बसून बदलीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केलेल्या बदलीच्या वेळापत्रकात सोमवारी बदल (Monday's change in replacement schedule) केला असून बकरी ईद आणि गुरूपौर्णिमेला सुट्टी असल्याने हे दिवस वगळून पुढील दिवशी ठरवून दिलेल्या विभागातील कर्मचार्‍यांची बदलीची प्रक्रिया पारपडणार आहे. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या दरवर्षी 31 मेच्या दरम्यान होणारी बदलीची प्रक्रिया यंदाही करोना संसर्गामुळे लांबली आहे. मात्र, नगर जिल्हा परिषद प्रशासनाने एप्रिलअखेर बदली पात्र कर्मचार्‍यांची सेवा जेष्ठता यादी तयार करून त्यावर हरकती घेवून अंतिम पात्र कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून ठेवलेली आहे. या यादीतील बदलीस पात्र कर्मचार्‍यांच्या बदल्या आजपासून होणार आहेत.

दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशानूसार आधी सामान्य संवर्गातील बदल्या झाल्यानंतर विशेष संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यामुळे 53 वर्षापेक्षा अधिक वय आणि विशेष संवर्ग असणार्‍या बदली पात्र करण्याची गैरसोय होणार आहे. सर्वसाधारण बदल्यात सोयीच्या जागा संपणार असल्याने विशेष संवर्गातील बदली पात्र कर्मचार्‍यांना पर्याय शिल्लक राहणार नाहीत. आज (दि.20) सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत सामान्य प्रशासन विभाग, दुपारी 12.30 ते 2.30 यावेळेत अर्थ विभाग, त्यानंतर कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहे. 21 तारखेला सुुट्टी असून 22 तारखेला सकाळी 10 ते 11 या वेळेत लघू पाटबंधारे विभाग, 11 ते 12 या वेळेत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत पशूसंवर्धन विभागाच्या बदल्या होणार आहेत.

त्यानंतर पुन्हा 23 तारेखला पुन्हा सुट्टी असून 24 तारखेला प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांच्या सकाळी 10 ते दुपारी 1, त्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या दुपारी 2 ते 6 या वेळेत, पुन्हा 25 तारेखला सुट्टी असून 26 तारखेला सकाळी 10 ते 2 यावेळेत ग्रामपंचायत विभाग, दुपारी 2.30 ते 3.30 यावेळे महिला बालकल्याण विभाग, 27 तारखेला पुन्हा सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आरोग्य विभागातील तर 28 तारखेला सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत शिपाई संवर्गाच्या बदल्या होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली. करोनामुळे पहिल्या या सर्व बदल्या ऑनलाईन पध्दतीने झुम ऑपवर होणार आहेत.

जिल्हा परिषद स्तरावरील बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तालुका पातळीवर 29 व 30 तारखेला गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीमध्ये होणार आहेत. तसेच होणार्‍या बदल्या या 15 ऐवजी 20 टक्के होणार असून यात 10 टक्के प्रशासकीय आणि 10 टक्केे विनंती बदल्यांचा समावेश राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com