झेडपी कर्मचारी सोसायटी निवडणूक तापली !

दोन्ही पॅनलचा जिल्हाभर प्रचाराचा धुराळा : सोशल मीडियावरही आरोप- प्रत्यारोपाचे वॉर
झेडपी कर्मचारी सोसायटी निवडणूक तापली !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवारी मतदान (Voting) होणार्‍या जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा प्रचार (Zilla Parishad employee Society) आता चांगलाच रंगात आला आहे. सत्ताधारी जय गणेश मंडळा विरोधात विरोधी पावन गणेश मंडळ जिल्हाभर प्रचाराची (Propaganda) राळ उठवली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी जय गणेश मंडळाने देखील प्रत्येक तालुक्यात मतदारांपर्यंत पोहचत, आपला पाच वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडत आहेत. यामुळे मतदार सभासद (Voter Member) कोणाच्या मागे उभे राहणार हे सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था (Zilla Parishad employee Credit Union) ही कर्मचार्‍यांची आर्थिक कणा असणारी संस्था आहे. संस्थेचा कारभार काटकसरीने चालवा, अशी या संस्थेच्या सभासदांची मागणी आहे. मागील पंचवार्षिकला याठिकाणी सुभाष कराळे यांच्या नेतृत्वाखाली पावन गणेश मंडळाची सत्ता होती. मात्र, त्यावेळी विजय कोरडे, राजेंद्र म्हस्के आणि अशोक काळापहाड यांनी श्री गणेश मंडळाच्या माध्यमातून पावन गणेश मंडळाच्या सत्तेला पूर्णविराम लावला. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत चिन्ह वाटप झाल्यानंतर कोरडे यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत ऐनवेळी पावन गणेश मंडळाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, सत्ताधारी मंडळातील संजय कडूस, अरूण जोर्वेकर आणि गणेश शेळके यांनी जय गणेश मंडळाच्या नावाने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन्ही मंडळाने निवडणुकीत चांगलाच जोर लावला असून तालुकानिहाय पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय मतदारांची भेट घेऊन निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही मंडळाकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तालुक्याच्या ठिकाणी होणार्‍या बैठकांमध्ये गर्दी होत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत.

आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस असून सत्ताधारी आणि विरोधकांनी उत्तेरतील तालुक्यांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर प्रचाराची रंगत वाढली असून व्हॅाट्सअ‍ॅप गु्रपवर एका दिवसात दोन-दोन हजारांहून मेसेजेस टाकून आपापल्या मंडळाचे समर्थन करण्यात येत आहे. तसेच आरोपांचे वॉर रंगले आहे.

जिल्हा परिषद सोसायटी निवडणूक आता सभासदांनी हाती घेतली आहे. पावन गणेश मंडळाचे जिल्हाभर फटाके वाजवून स्वागत होत आहे. यावरून सभासद आमच्यासोबत असल्याचे दिसत आहे. पाच ते सहा वर्षांतील चुकीचा कारभार सभासदांनी पाहिलेला आहे. सत्ताधार्‍याचा जाहीरनामा फसवा असून सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरूस्त करून कायम ठेवीवरील व्याजदर कमी करण्याचा डाव जागृत संचालक आणि ठेवीदारांनी हाणून पाडला. आमच्या कार्यकाळात चेअरमन पदासाठी निवडणूक झाली नाही. यांच्या काळात चेअरमन पदाचा घोडेबाजार झाला. फोडाफोडीचे राजकारण केले. निवडणुकीत यश आम्हालाच मिळणार आहे. सर्व संचालकांना समान संधी देणार असे, सत्ताधार्‍यांनी सांगितले होते. मात्र, काहींनी दोन-दोन वेळा चेअरमनपद भूषवले. यामुळे संचालकांना संधीच मिळाली नाही, हे सभासदांनी पाहिलेले आहे.

- सुभाष कराळे, नेते पावन गणेश मंडळ.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com