जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंता चौधर निलंबित

बेलापूर ग्रामपंचायतीच्या विद्युत कामातील गैरप्रकार भोवला
जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंता चौधर निलंबित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या विद्युत कामाच्या अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिकेबाबत मागणी करून ते तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही. तसेच दुसर्‍या त्रयस्त यंत्रणे मार्फत बेलापूर ग्रामपंचायतीच्या विद्युत कामाची तासणी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंता बी.बी. चौधर यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

ते नगरला विद्युत विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत आहेत. बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील ग्रामपंचायतीत झालेल्या विद्युत कामाच्या अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिकेबाबत मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी करूनही त्यांनी उपलब्ध करून दिले नाही. यामुळे या कामांची स्वतंत्रपणे शासकीय तंत्रनिकेतन नगर (विद्यूत विभाग) यांच्यावतीने तांत्रिक तपासणी आणि चौकशी करण्यात आली.

या अहवालात चौधर यांनी नमुद केलेले परिमाण यात तफावत आढळून आली. यावरून शाखा अभियंता यांनी या कामात गैरव्यवहार केला असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) च्या तरतुदीनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हा परिषद संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत चौधर यांचे मुख्यालय हे नगर ठेवण्यात आलेले आहे.

बेलापूर गावात ग्रामपंचायतीमध्ये दोन राजकीय गटातील वादात चौधर यांचा बळी गेला असून चौधर यांनी एका गटाचे ऐकून कामे केल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारी तथ्य आढळून आल्याने त्यांना आता निलंबित व्हावे, लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com